Youtube ChannelSubscribe Now

Featured Post

                     *पवनमुक्तासन*



                 Pawanmuktasana 





❇️या आसनामुळे आपल्या पोटातील वायू मुक्त होतो. म्हणून याचे नांव पवनमुक्तासन आहे.


This yoga pose, as its name suggests, is excellent for releasing abdominal gas. Pawanmuktasana is pronounced as PUH-vuhn-mukt-AAHS-uh-nuh.


Pavana = wind, mukta = relieve or release, Asana = Posture or Pose


❇️पोटातील वायू आणि अपचन यामध्ये पवनमुक्तासन कां गरजेचे आहे?

 

❇️भारतात एक जुनी म्हण प्रचलित आहे, जर एखाद्याचा मेंदू आणि पोट निरोगी असेल तर ती व्यक्ती ऐश्वर्यसंपन्न होय. थोडक्यात एखाद्याचे मन शांत असेल आणि पोट निरोगी असेल तर ती व्यक्ती तंदुरुस्त आणि समाधानी असते. तेंव्हा हे दोन्ही संलग्न असल्याने पचन संस्था निरोगी आणि मजबूत असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी पोटातील वायू सरण्यासाठी आणि पचन ठीक होण्यासाठी पवनमुक्तासन गरजेचे आहे.


❇️ *पवनमुक्तासन कसे करावे*


❇️पाठीवर झोपा. 


❇️दोन्ही पाय जवळ ठेवा, 


❇️दोन्ही हात शरीराजवळ ठेवा.


❇️एक श्वास घ्या व तो सोडता सोडता उजवा गुडघा छातीपाशी घ्या. 


❇️दोन्ही हाताचे पंजे एकमेकांत गुंतवून गुडघा पोटावर दाबा.


❇️पुन्हा एकदा एक श्वास घ्या व तो सोडता सोडता डोके आणि छाती जमिनीपासून वर उचला व तुमच्या हनुवटीचा उजव्या गुडघ्याला स्पर्श करा.


❇️याच स्थितीत काही दीर्घ श्वास घ्या.


❇️ *लक्षात ठेवा:* प्रत्येक बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर गुडघा दोन्ही हातांनी आणखी दाबा. छातीवरील दाब वाढवा. जसा श्वास सोडाल तशी पकड ढिली करा. 


❇️श्वास सोडता सोडता शरीर जमिनीला टेकवा व आराम करा.


❇️ह्याच पद्धतीने डाव्या पायाने आसन करा व नंतर दोन्ही पाय घेऊन करा.


❇️ह्या आसनस्थितीत (दोन्ही पाय घेऊन केलेल्या) वर-खाली व दोन्ही बाजूंना शरीराला ३-५ वेळा झोके द्या व आराम करा.


❇️हे आसन पद्मसाधनेचा (विशिष्ट क्रमाने केलेली विशिष्ट आसने) एक भाग आहे. पद्मसाधना आर्ट ऑफ सायलेन्सआणि डीएसएन कोर्समध्ये शिकविली जाते.


❇️ *पवनमुक्तासनाचे फायदे*


❇️पोटाचे व पाठीचे स्नायू बळकट होतात.



❇️हातांचे आणि पायांचे स्नायू पुष्ट होतात.


❇️पोटातील आतडी व इतर अवयवांचे मर्दन होते.


❇️पचनशक्ती सुधारते आणि पोटातील वायू बाहेर निघतो.


❇️पार्श्वभागातील सांध्यांमध्ये रक्ताभिसरण वाढते व पाठीच्या खालच्या भागाचा ताण कमी होतो.


❇️ *पवनमुक्तासन कधी करू नये*


❇️जर तुम्हाला खालील अवस्था अथवा आजार असतील तर पवनमुक्तासन करू नये:


❇️उच्च रक्तदाब, हृदयविकार, पित्त, हार्निया, स्लीपडिस्क, वृषणविकार, मासिक पाळीचा त्रास, मानेचे व. पाठीचे विकार आणि गरोदरपणातील दुसऱ्या तिमाहीपासून करू नये.


Post a Comment

Previous Post Next Post

Follow Us

 


 We spend our valuable time, energy and money to produce videos and articles for your convenience. Please show some appreciation by subscribing to our YouTube channel and sharing the articles of this blog in your Social Media Profiles. This one second act of yours will help us to grow and inspire us to do something even better in the near future.
Youtube ChannelSubscribe Now
5 seconds remaining
Skip Ad >