❇️शीर्ष म्हणजे डोके व डोक्यावर संपूर्ण शरीराचा भार टाकून केल्या जाणार्या आसनाला 'शीर्षासन' म्हटले जाते.
❇️ *पद्धत*-
❇️दोन्ही पायाची गुढघे जमिनीवर टेकवून दोन्ही हाताची पंजे देखील जमिनीवर टेकवावे.
❇️त्यानंतर हाताची बोटे मिळवून चांगल्याप्रकारे ग्रिप बनवून घ्यावे.
❇️त्यानंतर आपले डोके ग्रिप बनवलेल्या हातांच्या जवळ टेकवावे. त्यामुळे डोक्याला हातांचा आधार मिळेल.
❇️गुढघे जमिनीपासून वर उचलून पाय लांब करावे.
❇️त्यानंतर हळू हळू हाताची पंजे डोक्याच्या जवळ घ्यावे व लांब केलेल्या पायांच्या पंज्यांना देखील एकमेकाच्या जवळ करावे. व संपूर्ण शरीराचा भार जमिनीला टेकलेल्या डोक्यावर द्यावा.
❇️काही वेळ या अवस्थेत राहून पुन्हा आधीच्या अवस्थेत येण्यासाठी पाय गुढघ्यामध्ये मोडून गुढघे पोटाच्या जवळ आणून पायाची पंजे जमिनीला टाकवावे.
❇️त्यानंतर डोके जमिनीवर काही वेळ टेकवावे व जमिनीवरून डोके उचलून वज्रासनमध्ये बसून आधीच्या स्थितीत यावे.
*सुरवातीला शीर्षासन भिंतीचा आधार घेऊन योगशिक्षकाच्या देखरेखीत करावे. डोके जमिनीला टेकवताना आधी हे लक्षात घ्या की, डोक्याचा मध्य भाग जमिनीवर टेकलेला आहे. डोके अशा पद्धतीने जमिनीवर टेकवावे की, त्यामुळे मान व पाठीचा कणा सरळ रेषेत ताठ राहील. पायांना देखील हळू हळू वर उचलावे. व सामान्य स्थितीत येण्यासाठीही एकदम झटक्याने जमिनीवर न ठेवावे. ज्या व्यक्तीला डोके, पाठ व पोटाचे विकार असतील त्यांनी शीर्षासन करू नये*
*फायदे -*
❇️ शीर्षासन केल्याने पाचनक्रियेत लाभ होतो.
❇️शीर्षासन नियमित केल्याने मस्तिष्कमध्ये रक्त प्रवाह सुरळीत होतो व वाढतो.
❇️तसेच स्मरणशक्ती वाढते.
❇️हर्निया, अपचन आदी आजारावर उत्तम उपाय आहे.
❇️अवेळी केस गळणे व पांढरे होणे कमी होते.
🌹आरोग्यम् धनसंपदा🌹
Post a Comment