Youtube ChannelSubscribe Now

Featured Post

महाज्योती,नागपूर मार्फत “कौशल्य विकास प्रशिक्षण व रोजगार”

कौशल्य विकासातून रोजगार !!

रोजगारातून स्वावलंबन !! स्वावलंबनातून आत्मसन्मान !!!



महाराष्ट्र शासनाच्या महाज्योती, नागपूर या स्वायत्त संस्थेमार्फत नागपूर महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागासप्रवर्गातील 18 ते 45 वयोगटामधील तसेच नॉनक्रिमीलेअर गटातील युवक-युवतींनी निवासी व अनिवासी स्वरूपाचे विविध क्षेत्रातील मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पात महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागासप्रवर्गातील बेरोजगार युवक-युवतींना नामवंत प्रशिक्षण संस्थांमधून विविध टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या युवक-युवतींना रोजगाराच्या (Placements) विविध संधी उपलब्ध करून देण्यात येतात.

नोंदणीकरिता आवश्यक पात्रता :


1. उमेदवार व्यक्ती ही महाराष्ट्राची रहिवासी असावी.

2. उमेदवार व्यक्ती ही इतर मागासवर्ग/ विमुक्त जाती व भटक्या जमाती /विशेष मागासप्रवर्ग गटातील असावी.

3. उमेदवार व्यक्ती ही नॉनक्रिमीलेअर गटातील असावी.

4. उमेदवार व्यक्तीने कौशल्य विकास प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण केलेली असावी.

5. उमेदवार व्यक्तीची कोणत्याही ठिकाणी रोजगार करण्याची तीव्र इच्छा असावी.

सध्यस्थितीत महाज्योती मार्फत राबविण्यात येणारे कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम :

अ. क्र.  Name of Courses  Educational Criteria
1. EMS Technician 12th
2. Technical Support Engineer 12th
3. Retail Sales Associate 10th
4. Inventory Clerk 10th
5. Machine Operator-Plastic Processing (MO-PP) 12th
6. Machine Operator-Injection Moulding (MO-IM) 8th
7. Machine Operator-Tool Room (MO-TR) 8th
8. Machine Operator & Programmer-(CNC Lathe) 10th/ITI/Diploma
9. Machine Operator & Programmer-(CNC Miling) 10th/ITI/Diploma
10. Maintenance Of Machinery -Technician10th/ITI/Diploma
11. General Duty Assistant10th
12. Emergency Medical Technician 12th
13. Home Health Aid 10th
14. Warehouse Supervisor Any Diploma
15. CRM Domestic Voice 10th
16. Web Developer 12th

उमेदवारांनी पुढीलप्रमाणे नोंदणी करावी :

महाज्योती, नागपूर कार्यालयाच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावरील नोटीस बोर्ड मधील “कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम 2021 – नोंदणी अर्ज” यावर नोंदणी करावी. मुदतीनंतर नोंदणी करता येणार नाही. नोंदणी केलेल्या उमेदवारांची मुलाखत घेऊनच अंतिम निवड करण्यात येईल.निवडीबाबतचे अंतिम अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती, नागपूर यांना राहतील.

skill-development-mahajyoti

कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम 2021 - नोंदणी अर्ज

Click 

Post a Comment

Previous Post Next Post

Follow Us

 


 We spend our valuable time, energy and money to produce videos and articles for your convenience. Please show some appreciation by subscribing to our YouTube channel and sharing the articles of this blog in your Social Media Profiles. This one second act of yours will help us to grow and inspire us to do something even better in the near future.
Youtube ChannelSubscribe Now
5 seconds remaining
Skip Ad >