Youtube ChannelSubscribe Now

Featured Post

 *नकळत आत्मपरीक्षण*



x

--








1) सिग्नलवर उभ्या असलेल्या एका फकीराने हात पुढे केले. मी खिसे तपासले तर फक्त हजाराची नोट निघाली. मी त्याला देऊन टाकली.

बाबा सांगायचे साधू-फकीराला रिकाम्या हाती धाडू नये. तेव्हा मी विचारलेलं, "तो स्वस्थ, हट्टाकट्टा असला तरीही?" त्यावर बाबांनी हजरत अली साहेबांचं एक वचन ऐकवलेलं, "देवाने आपल्याला आपल्या लायकीपेक्षाही खूप दिलेलं असतं."


दुसऱ्या दिवशी मला पुन्हा त्या सिग्नलला थांबावं लागलं. आणि मी पाहिलं.. कालचा भीक मागणारा फकीर आज नारळ विकतो आहे.


●●●●●


२)

--

"माझी तीन मुलं आहेत. ते नेहमी एकत्र राहावेत. म्हणून मीे तीन मजली घर बांधलं," असं आमचा बाप म्हणायचा. 

तो गेल्यावर आम्ही हे घर विकायला काढलं. आम्ही तीन भाऊ ना एकत्र राहू शकतो, ना आमच्या बायका. 

घर विक्रीची बातमी पेपरमध्ये दिली. बरेचजण घर घ्यायला ऊत्सूक होते. त्यातल्या एकाशी सौदा ठरला. मी सहज म्हणून त्यांना विचारलं, "हे घर तुम्हांला का आवडलं?"

त्यावर ते म्हणाले, " माझी तीन मुलं आहेत. ते नेहमी एकत्र राहावेत. म्हणून मला तीन मजली घर हवंय...'


●●●●●


३)

--

खूप चालायला लागयचं तेव्हा रडायला व्हायचं. नंतर गाडी घेतली आणि चालायची सवय मोडून गेली. 

गाडी विकल्यावर पायी चालणं कठीण झालं.

एकेदिवशी दवाखान्यात जायचं होतं. नेमकी तिकडे जाणारी बस मिळाली नाही. मग खूप चालून दवाखान्यात पोचलो. पाय वैतागून दुखू लागलेले. मी रिसेप्शन हॉल मधे बसलो. माझ्या बाजूला बसलेला एक इसम म्हणाला, "आज चालून चालून खूप खांदे दुखायलेत."

मला हसू आलं. 

मी म्हणालो, "चालून तर पाय दुखतात."


नंतर माझी नजर त्याच्या काठ्यांकडे गेली.


●●●●●


४)

--

मी डॉक्टरांची फीस भरून नंबर लावला. फीस भरल्याची पावती घेऊन रिसेप्शन हॉलमध्ये बसलो. खरंतर ह्या डॉक्टरांची फीस जरा जास्तच आहे. पण रुग्ण येत होते, नंबर लावत होते. 

एक म्हाताऱ्या आज्जी रिसेप्शनिस्ट पर्यंत आल्या. त्यांच्या डोळ्यांत आशेची किरणं दिसत होती, पण डॉक्टरांची फीस ऐकून त्यांचा चेहरा पडला. त्या त्यांच्या आजारी मुलाशी काहीतरी बोलल्या आणि दोघंही परत जायला निघाले. 

मी त्यांना थांबवलं आणि माझी पावती देऊ केली.

"मला काहीही झालेलं नाहीये. मी इथे दरमहा नंबर लावून ही पावती एका गरजवंताला देतो. याने मला महिनाभर कुठल्याच डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येत नाही."


●●●●●


५)

--

खूप दिवसांनी मला काल काम मिळालं. 

कारखान्यात कधी लाईट नसते, तर कधी गॅस संपतो. मशीन्स बंद पडतात तेव्हा आमच्या चुली विझतात. 

मग कधी मी उधार मागतो, तर कधी भीक.. कधी मुलंही उपाशी झोपतात.

पण काल चूल पेटलेली, मुलं पोटभर जेवलेली.

कारखाना तर बंदच होता. पण एका नेत्याने मोर्चा काढलेला. त्यात मला घोषणा द्यायचं काम मिळालं. आणि मोर्चा संपल्यावर प्रत्येकी पाचशे रूपये.


मी खूश होऊन विचारलं,

"साहेब, आता पुढचा मोर्चा कधीये?"

नेता म्हणाला,

"हा मोर्चा दरवर्षी 1 मे ला निघतो."


●●●●●


६)

--

शहरात एक असं दुकान उघडलंय जिथं वेळ विकत मिळतो. 

ही माहिती मला एका मित्राने दिली. मी त्या दुकानाचा पत्ता मिळवला आणि तिथे पोचलो.


"माझ्याकडे खूप पुस्तकं जमा झाली आहेत, पण मला ती वाचायला वेळ मिळत नाही. मला आठवड्यातून चार दिवस १ तास वाढवून हवा आहे."

मी विक्रेत्याला म्हणालो. तो जरासा हसला, मग देतो म्हणाला.


मी खिशातलं पॉकेट काढत त्याला विचारलं, "एका तासाचे किती रूपये?"


विक्रेता म्हणाला, "पैशाने वेळ वाढवून मिळत नाही. त्याची किंमत तुम्हांला झोपेने चुकवावी लागेल." 


●●●●●


७)

--

"ह्या रेल्वेत कोणी टी.सी. येतो का?"

बर्लिनमधे प्रवास करत असतांना मी एकाला विचारलं

"माझं तिकीट कोणी का चेक करेल?"

जर्मन मित्र आश्चर्य व्यक्त करत म्हणाला.


"गृहीत धर, की तू तिकीट काढलेलंच नाहीये. मग?"

त्याने गृहीत धरायचा प्रयत्न केला पण त्याला ते शक्य झालं नाही.


"तू कधी तुझ्या देशात विनातिकीट प्रवास केला आहेस?"

त्यानेच उलट विचारलं.

"कितीतरी वेळा." मी म्हणालो.


"मला तुझ्या देशाबद्दल फारसं माहीत नाही." तो म्हणाला

"..पण, जर तू दोन रूपयाचा भ्रष्टाचार करत असशील,

तर तुमचे नेते दोनशे अरबचा तर करत असतीलच."


●●●●●


८)

--

"तुम्ही हसता तेव्हा ही दुनिया तुमच्यासोबत हसते.

तुम्ही रडता तेव्हा ही दुनिया तुमच्यावर हसते."

चार्ली चैपलिन म्हणाला.

मला हे पटलं.


लोकं खरंच त्याच्या प्रत्येक कृतीवर हसतात.


मी एकदा त्याचा इंटरव्ह्यू घ्यायला गेलेलो. तो ड्रेसिंग रूममध्ये बसलेला.

आवरून झाल्यावर तो खूप वेळ आरसा न्याहाळत राहिला.


"मला वाटतं तुम्ही स्वत:चे फेवरेट आहात" 

मी मुद्दाम त्याला डिवचत म्हणालो.


"मुद्दा तो नाही.. हा आरसा, माझा खरा मित्र आहे." 

तो म्हणाला

"मला रडतांना पाहून तो माझ्यावर हसत नाही." 


●●●●●


९)

--

"डोकं खूप दुखतंय. मला ब्रेन ट्यूमर तर झाला नसेल?"

मी चिंतेने म्हणालो.

"डॉक्टर मुर्तजाला दाखव" एकाने सल्ला दिला.

मी कामात होतो म्हणून डॉक्टरांकडे जाता आलं नाही.


काही दिवसांनी -

"पायऱ्या चढून मला धापा भरत आहेत.

ह्रदयाचा तर काही प्रॉब्लेम नसेल?"

"डॉक्टर मुर्तजाला दाखव" 

त्याने पुन्हा सुचवलं.

मला याही वेळी जाता आलं नाही.


आणखी काही दिवसांनी -

"मला थकवा आल्यासारखा वाटतोय.

हा मधूमेह तर नसेल?"

"डॉक्टर मुर्तजाला दाखव" 

आता तर त्याने हट्टच धरला.

"अरे पण डॉक्टर मुर्तजा नक्की कशाचे स्पेशालिस्ट आहेत?" 

मी त्याला विचारलं.


"राईचा पर्वत बनवायचे" 

तो उत्तरला.


●●●●●


१०)

----

माझ्या सोबत एक विचित्र घटना घडली. माझा पगार २४ तारखेला महिन्याच्या आत संपला. या आधी असं कधीच झालं नव्हतं.

 

२५ ला मी परेशान झालो

२६ ला बँकेने आठवड्यापुर्वीचं एक ट्रांसेकशन दुरुस्त करुन माझ्या खात्यात पैसे टाकले

२७ ला एका मित्राने काही महिण्यांपुर्वी उसणे घेतलेले पैसे परत केले

२८ ला जुन्या डायरीत बक्षीस म्हणून मिळालेलं एक पाकीट हाती लागलं

२९ ला माझ्या बढतीचं लेटर मिळालं, तेव्हा न राहून मी बायकोला विचारलंच, "या आठवड्यात नवीन काय सुरू केलं आहेस, खरं सांग?"


बायको चकीत होऊन म्हणाली, "काही नाही, चार दिवसांपासून गच्चीवर पक्षांसाठी थोडी बाजरी आणि पाणी ठेवतेय"


●●●●●

Post a Comment

Previous Post Next Post

Follow Us

 


 We spend our valuable time, energy and money to produce videos and articles for your convenience. Please show some appreciation by subscribing to our YouTube channel and sharing the articles of this blog in your Social Media Profiles. This one second act of yours will help us to grow and inspire us to do something even better in the near future.
Youtube ChannelSubscribe Now
5 seconds remaining
Skip Ad >