🎓 Shubham Study - MPSC, 10th & 12th Notes Free Access |

Shubham Study

Educational Portal

JOB

Loading...

View All
लोड होत आहे...

HEALTH

Loading...

View All
लोड होत आहे...

Gk

Loading...

View All
लोड होत आहे...

YOJANA

Loading...

View All
लोड होत आहे...
Loading Slider...

करवंद Health tips

SHARE NOW:

 करवंद

Health tips : हे आहेत करवंद खाण्याचे फायदे


 करवंद


  • करवंदामध्ये नैसर्गिकरीत्या कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असल्याने हाडांच्या विकारांमध्ये फायदा होतो. वर्षभर करवंद खाता यावे म्हणून करवंदाचे लोणचे, मुरंबा, सरबत बनवून ठेवावे.

  • करवंदांची चटणी करतात, याचबरोबरीने सरबत, लोणचे, मुरंबा करता येतो. या फळामध्ये आरोग्यदायी गुणधर्म आहेत. रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवत असेल तर रोज मूठभर करवंदे खावीत. याने रक्ताची कमतरता नक्कीच भरून येईल.

  • करवंदामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने त्वचाविकारामध्ये याच्या सेवनाचा फायदा दिसून येतो. ‘क’ जीवनसत्त्वामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते.

  • करवंदामध्ये मोठ्या प्रमाणात सायट्रिक अ‍ॅसिड असल्यामुळे उष्णतेमुळे होणारे विकार कमी होतात.

  • सूर्याच्या प्रखर उष्णतेने जर शरीराचा दाह होत असेल, तर करवंदाचे सरबत प्यावे.

  • करवंदामध्ये तंतू भरपूर प्रमाणात असल्याने मलावष्टंभाचा त्रास कमी होतो.

  • अरुची, मळमळ, उलटी या विकारांमध्ये करवंदे अत्यंत गुणकारी आहेत.

  • आम्लपित्तामुळे छातीत जळजळ होत असेल तसेच आंबट ढेकर येत असतील, तर अशा अवस्थेत करवंदाचे सरबत थोड्या-थोढ्या अंतराने पीत राहावे, काही वेळाने आराम वाटतो.

  • करवंदामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने हृदयविकारामध्ये करवंदाचे सेवन उपयुक्त ठरते. यामुळे रक्तवाहिन्यातील चरबीचे प्रमाण कमी होऊन रक्तपुरवठा सुरळीत होतो.

  • करवंदाच्या रसामध्ये मधुरता आणि आम्लता असल्यामुळे अपचन झाले असेल, तर अन्नाचे पचन होण्यासाठी करवंदाचे सरबत थोड्या थोड्या अंतराने पीत राहावे.

  • करवंदे वातशामक असल्यामुळे पोटात गुबारा धरला असेल तर याच्या सेवनाने पोट व आतड्याचे आरोग्य चांगले राहून वायूचे मलावाटे निस्सरण होते.

  • करवंदाची पाने हीदेखील औषधी गुणधर्माने युक्त आहेत. ही पाने मधामध्ये बारीक करून खाल्ल्यास कोरडा खोकला नाहीसा होतो.

  • करवंदामध्ये नैसर्गिकरीत्या कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असल्याने हाडांच्या विकारांमध्ये फायदा होतो. वर्षभर करवंद खाता यावे म्हणून करवंदाचे लोणचे, मुरंबा, सरबत बनवून ठेवावे.

  • गर्भवतीने उलटी, मळमळ, अरुची ही भावना कमी होण्यासाठी व विपुल प्रमाणात कॅल्शिअम मिळण्यासाठी ऋतूमध्ये मूठभर करवंदे खावीत.

  • करवंद फळे खाण्यापूर्वी स्वच्छ धुऊन घ्यावीत.


मागील लेख पुढील लेख
Author

Shubham Dubukwad

Hello students! I provide high-quality educational notes, syllabus breakdowns, and job updates to help you succeed in your career and board exams. Follow for daily updates!

विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

तुमचा प्रश्न किंवा शंका येथे विचारा:

NCERT

Loading...

View All
लोड होत आहे...
WhatsApp Group Telegram Channel Email Us