Youtube ChannelSubscribe Now

Featured Post

 25 *बद्धकोणासन*





Baddha konasana in Marathi | बद्धकोनासन | बद्धकोणासन | फुलपाखरासारखे आसन

बद्ध = बांधलेले, कोन = कोन , आसन =शारीरक स्थिती

या आसनाचा उच्चार बह-दह-कोन-आसन असा करतात.

या आसनाचे नाव बद्धकोनासन ठेवले गेले आहे ते त्याच्या करण्याच्या पद्धतीवरून – दोन्ही पावले ही जांघेजवळ दुमडली जातात आणि त्यांना हातांनी घट्ट धरून ठेवले जाते, जसे काही त्यांना एका विशिष्ठ कोनामध्ये बांधून ठेवले आहे. याचे फुलपाखरासारखे आसन असे लोकप्रिय नाव आहे कारण यामध्ये पायांची हालचाल ही फुलपाखराने पंख फडफडवण्यासारखीच होते. या आसनाला काहीवेळा चांभार आसन असेसुद्धा म्हणतात कारण या आसनात बसण्याची पद्धत ही एका कामात व्यग्र असणाऱ्या चांभाराप्रमाणेच भासते.

बद्धकोनासन कसे करावे | How to do Baddhakonasana

पाठीचा कणा ताठ ठेवून आणि दोन्ही पाय समोर सरळ पसरून बसा.

आता गुडघे वाकवा आणि तुमच्या  जांघेजवळ आणा. तुमच्या पायाचे तळवे एकमेकांना चिकटलेले असले पाहिजे.

तुमची पावले हलक्या हातांनी धारा. आधाराकरिता म्हणून तुम्ही तुमचे हात तुमच्या पावलांच्या खाली ठेवू शकता.

पायाच्या टाचांना जितके शक्य आहे तितके जास्त जननेंद्रियांकडे आणा.

एक दिर्घ श्वास घ्या. श्वास बाहेर सोडा, मांड्या आणि गुडघ्यांना जमिनीवर खालच्या दिशेने दाबून ठेवा. खाली दाबून ठेवण्याचा हळूवार प्रयत्न करा.

आता फुलपाखरू जसे आपले पंख हलवते त्याप्रमाणे पाय वरखाली हलवा. सावकाश सुरुवात करा आणि हळूहळू वेग वाढवत न्या. संपूर्ण वेळ सामान्य श्वासोच्छवास सुरु ठेवा.

उंच उंच उडू लागा तुम्हाला जितके सहजपणे शक्य होईल त्या वेगाने. वेग कमी करा आणि मग थांबा. एक दिर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडता सोडता पुढच्या दिशेने वाका, हनुवटी वरच्या दिशेने आणि पाठीचा कणा ताठ.

तुमच्या हाताच्या कोपारांना मांडीवर किंवा गुडघ्यांवर दाबून गुडघे आणि मांड्यांना जमिनीच्या अधिक जवळ ढकला.

मांड्यांच्या आतील बाजूस पडणारा ताण जाणावा आणि दिर्घ मोठे श्वास घेत रहा, स्नायूंना अधिकाधिक शिथिल करा.

एक दिर्घ श्वास घ्या आणि शरीराच्या वरच्या भागाला वर उचला.

जसजसा तुम्ही श्वास सोडत जाल तसतसे सावकाशपणे आसन सोडायला लागा. पाय समोरच्या बाजूला लांब करा आणि आरामात बसा.

बद्धकोनासन फायदे | Benefits of the Baddhakonasana
मांड्यांची आतील बाजू, जांघा आणि गुडघ्यांना चांगल्या प्रकारे ताणले जाते, जांघेची आणि नितंब भागाची लवचिकता सुधारते

आतडे आणि मलोत्सर्ग यांना मदत

होते.

अनेक तास उभे राहणे आणि चालणे यांनी येणारा थकवा दूर करते.

मासिक पाळीतील त्रास आणि रजोनिवृत्तीच्या लक्षणांतून सुटका देते.

गरोदरपणात शेवटी शेवटी सराव केल्यास बाळंतपण सुखरूप होते.

बद्धकोनासन करण्याचे निर्बंध | Contraindications of the Baddhakonasana

जर तुम्हाला जांघेमध्ये अथवा गुडघ्याला दुखापत झाली असेल तर मांड्यांच्या बाह्य भागाच्या खाली आधारासाठी गोधडी नक्की घ्यावी. तसेच, नितंबशुलाचा त्रास असणाऱ्या रोग्यांनी हे आसन अजिबात करू नये किंवा करायचे झाले तर नितंबाच्या खाली उशी घ्यावी. जर तुम्हाला खालच्या पाठीच्या दुखण्याचा त्रास असेल तर हे आसन पाठीचा कणा सरळ ठेवूनच करावे. पुढे वाकणे किंवा पाठीच्या मणक्याला गोलाकार फिरवणे पूर्णपणे टाळावे.








Post a Comment

Previous Post Next Post

Follow Us

 


 We spend our valuable time, energy and money to produce videos and articles for your convenience. Please show some appreciation by subscribing to our YouTube channel and sharing the articles of this blog in your Social Media Profiles. This one second act of yours will help us to grow and inspire us to do something even better in the near future.
Youtube ChannelSubscribe Now
5 seconds remaining
Skip Ad >