पोटखराब म्हणजे काय | पोटखराब जमिनीचे प्रकार | पोटखराब वर्ग अ | पोटखराब वर्ग ब.

potkharab-mahnje-kay-jminiche-parkar-a-b
पोटखराब म्हणजे काय | पोटखराब जमिनीचे प्रकार | पोटखराब वर्ग अ | पोटखराब वर्ग ब.
'पोट-खराब' क्षेत्राबाबत कायदेशीर तरतुद "महाराष्‍ट्र जमीन महसूल (जमिनीच्‍या वापरावरील निर्बंध) नियम १९६८, कलम २ अन्‍वये" आहे. 'पोटखराब' क्षेत्र म्‍हणजे खडकाळ, खंदक, खाणी, नाले, इत्‍यादीने व्‍याप्‍त असलेले क्षेत्र ज्‍यात पिक लागवड करता येणे शक्‍य होत नाही असे लागवडीयोग्‍य नसलेले क्षेत्र. या 'पोटखराब' क्षेत्राचे ''पोटखराब' वर्ग अ' आणि ''पोटखराब' वर्ग ब' असे दोन प्रकार आहेत.   'पोटखराब-वर्ग अ' म्‍हणजे खडकाळ क्षेत्र, नाले, खंदक, खाणी इत्‍यादीने व्‍याप्‍त असलेले क्षेत्र. वर्ग अ अंतर्गत येणार्‍या पोटखराब क्षेत्रावर महसूलाची आकारणी करण्‍यात येत नाही. जरी अशी जमीन शेतकर्‍याने कोणत्याही लागवडीखाली आणली तरीही अशी जमीन आकारणीस पात्र असणार नाही. 'पोटखराब-वर्ग अ' प्रकाराखाली येणार्‍या क्षेत्राची आकारणी करायची असेल तेव्‍हा त्‍याबाबतचा प्रस्‍ताव तहसिलदारांमार्फत मा. जमाबंदी आयुक्त यांना सादर करून आदेश प्राप्त करावा लागतो. अशा आदेशानंतरच 'पोटखराब-वर्ग अ' प्रकाराखाली येणार्‍या क्षेत्रावर आकारणी करता येते. तथापि, '…