Youtube ChannelSubscribe Now

Featured Post

​​🎇 भारत-बांगलादेशमध्ये 7 महत्त्वपूर्ण करार 🎇


◾️ढाक्क्यामध्ये विवेकानंद भवनची उभारणी होणार, एलपीजी गॅस बांगलादेशहून आयात करण्यास मान्यता
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्या भेटीमध्ये एकूण सात महत्त्वपूर्ण करारांवर सहय़ा करण्यात आल्या.



◾️  भारतासाठी आवश्यक असणाऱया एलपीजीची आयात करण्यास मान्यता देण्यात आली असून तीन संयुक्त उपक्रमांचाही व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करण्यात आले.

◾️ या भेटीमध्ये भारतातील व बांगलादेशातील रोहिंग्यांच्या आसऱयाचा प्रश्न आणि भारतात सुरु असणाऱया एनआरसीविषयीही चर्चा झाली. या दोन्ही प्रश्न पूर्ण सहकार्य करण्याचे बांगलादेशने मान्य केले आहे. संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी याची माहिती दिली.

▪️ करार पूर्वोत्तर राज्यांसाठी अधिक लाभदायी

◾️लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना चार दिवसांच्या भारत दौऱयावर आल्या आहेत

◾️. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होण्याकरता त्या भारतामध्ये आल्या आहेत.

◾️ दोन्ही पंतप्रधानांनी सात करारांवर स्वाक्षऱया करत तीन संयुक्त प्रकल्पांचे उद्घाटनही करण्यात आले.

◾️ पूर्वोत्तर राज्यांच्या विकासाच्या दृष्टीने हे करार महत्त्वाचे ठरणार आहेत.

◾️बांगलादेशमधून आयात होणाऱया एलपीजीचे वितरण पूर्वोत्तर राज्यांमध्ये केले जाणार असल्याने तेथील नागरिकांना स्वस्त आणि सुलभतेने इंधन उपलब्ध होणार आहे.

 ◾️चटगाव तसेच मंगला बंदरातून दोन्ही देशांमध्ये सुलभ वाहतुकीबाबतही करार करण्यात आला आहे.

◾️फेना नदीतून वाहतूक सुरु करण्याचाही प्रस्ताव असून यामुळे त्रिपुराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे. याशिवाय बांगलादेश आणि भारताच्या किनाऱयावरील सुरक्षेकरता गस्तीकरार करण्यात आला आहे.

📌ढाक्क्यात विवेकानंद भवनची उभारणी करणार

◾️सांस्कृतिक शैक्षणिक विकास परियोजनेअंतर्गत हैदराबाद आणि ढाक्का युनिर्व्हसिटीमध्ये आदानप्रदान करण्याचेही ठरवण्यात आले आहे.

◾️बांगलादेश, भारत औद्योगिक विकास परियोजनेतून कुशल कामगार आणि तंत्रज्ञ दोन्ही देशांसाठी तयार करण्यात येणार आहे.

◾️ढाक्क्यातील रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून तेथे विवेकानंद भवन उभारले जाणार असून या दोन महामानवांच्या जीवनापासून प्रेरणा घेत सामाजिक प्रगती साधली  जावी, असे उद्गारही दोन्ही पंतप्रधानांनी काढले.

📌 रोहिंग्यांना मूळस्थानी पाठवण्यावर एकमत

◾️दोन्ही देशांमध्ये चर्चेचा व काहीअंशी वादाचा विषय असणाऱया रोहिंग्या शरणार्थी तसेच एनआरसीच्या मुद्यांवरही सखोल चर्चा करण्यात आली.

◾️ पंतप्रधान मोदी यांनी रोहिंग्या शरणार्थींना अधिक काळ सांभाळणे भारताला शक्य होणार नसल्याचे स्पष्ट केले.

◾️ रोहिंग्यांवर आतापर्यंत सुमारे 120 कोटी रुपये खर्च झाला असून 40 हजारहून अधिक रोहिंग्या अनधिकृतपणे भारतात राहत असल्याचे सांगितले.

◾️शेख हसिना यांनी हा मुद्दा मान्य करत रोहिंग्यांना अधिक स्थान देण्यापेक्षा त्यांच्या मूळस्थानी पाठवणे योग्य ठरेल, असे मत मांडले.

◾️ आसाम तसेच पश्चिम बंगला व अन्य राज्यांमधील एनआरसीच्या मुद्यांवरही बांगलादेशचा कोणताही आक्षेप नसल्याचे त्यांनी मान्य केले.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Post a Comment

Previous Post Next Post

Follow Us

 


 We spend our valuable time, energy and money to produce videos and articles for your convenience. Please show some appreciation by subscribing to our YouTube channel and sharing the articles of this blog in your Social Media Profiles. This one second act of yours will help us to grow and inspire us to do something even better in the near future.
Youtube ChannelSubscribe Now
5 seconds remaining
Skip Ad >