Maharashtra New mantrimandal 2022/ मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर

Maharashtra New mantrimandal 2022/ मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर
ग्राम विकास मंत्री पुन्हा बदलले गिरीष महाजन यांच्याकडे खातं..🌍📡🌍📡🌍📡🌍📡🌍📡🌍 *⭕ राजकीय न्यूज ⭕* *💥 महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी बातमी, अखेर बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर* *📡 तर्फे = यू. आर. कट्यारमल, नागपूर* NEWS18 LOKMAT LAST UPDATED: AUGUST 14, 2022, 17:01 IST मुंबई, 14 ऑगस्ट : राज्य मंत्रिमंडळाचं अखेर खातवाटप जाहीर झालं आहे. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होवून 40 दिवस उलटल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता. त्यानंतर आठवडा उलटल्यानंतरही खातेवाटप जाहीर करण्यात आलं नव्हतं. खातेवाटपाच्या मुद्द्यावरुन विरोधकांकडून सरकारवर वारंवार ताशेरे ओढले जात होते. अखेर आज मंत्रिमंडळासाठी खातेवाटप जाहीर झालं आहे. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळात भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर मोठी जबाबादारी सोपवण्यात आली आहे. त्यांना महसूल विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक …