*update*
📋 *आयटीआय विद्यार्थ्यासाठी महत्वाची सूचना*
➖➖➖➖➖➖➖➖➖
1. औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेश 2022 साठी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात आली असुन सर्व उमेदवरांच्या खात्यात गुणवत्ता क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे तसेच त्यांना SMS व्दारे कळविण्यात आले आहे.
2. पहिल्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसायनिहाय निवडयादी 29.07.2022 रोजी सायं. 5.00 वाजता संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल व निवड झालेल्या उमेदवारांना SMS व्दारे कळविण्यात येईल.
3. पहिल्या प्रवेशफेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी दि.30.07.2022, सकाळी 09.00 पासुन 03.08.2022, सायं. 05.00 वाजेपर्यंत सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहुन प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करावी. उमेदवाराने सादर केलेल्या पसंतीक्रमाच्या पहिल्या विकल्पानुसार जागा मिळाल्यास उमेदवाराला प्रवेश निश्चित करावा लागेल. अशा उमेदवाराने प्रवेश निश्चित केला अथवा केला नाही तरीही त्यास केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या ते चौथ्या प्रवेश फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार नाही.
ज्या उमेदवारांना विकल्प क्र. 2 ते 100 मधुन जागा वाटप झाली आहे त्यांची इच्छा असेल तर ते प्रवेश निश्चित करु शकतात पण असे प्रवेश निश्चित केलेले उमेदवार केंद्रीय प्रवेश प्रक्रीयेच्या दुसऱ्या ते चौथ्या प्रवेश फेऱ्यांमध्ये सहभागी होवू शकणार नाहीत.
➖➖➖➖➖➖➖➖➖ /DESHING
Post a Comment