कूळ कायदा कलम-४३ च्या अटी | कूळ कायदा कलम-३२ (ग) च्या अटी | कूळ कायदा कलम-३२ (ओ) च्या अटी | कुळ हक्क | kul-kayda-mhnje-kay-kul-kase-tayar-hote
kul-kayda-mhnje-kay-kul-kase-tayar-hote
कूळ कायदा कलम-४३ च्या अटी | कूळ कायदा कलम-३२ (ग) च्या अटी | कूळ कायदा कलम-३२ (ओ) च्या अटी | कुळ हक्क | kul-kayda-mhnje-kay-kul-kase-tayar-hote
कुळ कायदा,कुळ हक्क, kul-kayda-mhnje-kay-kul-kase-tayar-hote कूळ कायदा कलम-४३ च्या अटी , कूळ कायदा कलम-३२ (ग) च्या अटी , कूळ कायदा कलम-३२ (ओ) च्या अटी , कुळ हक्क, कायम कूळ , * कूळ हक्क :- (१) सन १९३९ च्या कूळ कायद्यात दिनांक १/१/१९३८ पूर्वी सतत ६ वर्षे कूळ म्हणून जमीन करणार्या व्यक्तीला किंवा दिनांक १/१/१९४५ पूर्वी सतत ६ वर्षे जमीन कसणारा आणि दिनांक १/११/४७ रोजी जमीन कसणारा कूळ या सर्वांची नोंद नोंदणीपत्रकात संरक्षीत कूळ म्हणून केली गेली. (२) सन १९५५ साली कूळ कायद्यात काही सुधारणा करण्यांत आली. ही सुधारणा करण्यापूर्वी वहिवाटीमुळे किंवा रुढीमुळे किंवा कोर्टाच्या निकालामुळे ज्या व्यक्तींना कायम कूळ म्हणून संबोधण्यांत आले व ज्यांची नोंदणी हक्कनोंदणी पत्रकात कायम कूळ म्हणून नोंद केली गेली त्या सर्वांना कायम कूळ असे म्हटले जाते. (३) आज रोजी दुसर्याच्या मालकीची कोणतीही जमीन कायदेशीररित्या जर एखादा माणूस कसत असेल व अशी जमीन, जमीन मालकाकडून जातीने कसण्यांत येत नसेल तर त्याला कूळ असे संबोधले जाते. याचाच अर्थ तो माणूस जमीन मालकाच्या कुटूंबातील नसला पाहिजे किंवा जमीन गहाण घेणारा नसला पाहिजे किंवा पगार…