bhogvatadar-varg-landlord-class-2-and-leased-lands-to-occupier-class-1-rules |
भोगवटादार वर्ग एक म्हणजे ज्यांना हस्तांतरणावरील कोणत्याही निर्बंधाशिवाय जमीन निरंतर धारण करता येते अशा व्यक्ती, भोगवटादार वर्ग दोन म्हणजे आपल्या जमिनी निरंतर धारण करणारे परंतु त्या हस्तांतरित करण्यासंबंधीच्या ज्यांच्या अधिकारावर काही निर्बंध असतात अशा व्यक्ती, पट्टेदार म्हणजे पट्ट्याच्या अटींमध्ये विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा शर्तींच्या अधीन राहून तसेच विनिर्दिष्
ट करण्यात येईल अशा प्रयोजनार्थ विशिष्ट कालावधीकरिता शासनाकडील जमीन पट्ट्याने धारण करणारी व्यक्ती. वर्ग एक किंवा दोन मधील प्रत्येक भोगवटादाराने अधिनियम व त्याखाली तयार केलेले नियम यांच्या पबंधांन्वये निश्चित केलेले आकारणी जमीन महसूल म्हणून द्यावयाची असते, तर प्रत्येक सरकारी पट्टेदाराने पट्ट्याच्या अटींखाली निश्चित केलेली पट्ट्याच रक्कम (म्हणजेच भाडे) जमीन महसूल म्हणून द्यावयाची असते.
15 ऑगस्ट 1967 पासून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 अंमलात येण्यापूर्वी राज्याच्या विदर्भ प्रदेशात मध्य प्रदेश जमीन महसूल अधिनियम, 1954 अंमलात होता. मध्ये प्रदेश जमीन महसूल अधिनियमान्वये धारणाधिकार धारण करणारांचे दोन वर्ग होते. ते म्हणजे :-
भूमिस्वामींना आपल्या जमिनी हस्तांतरित करण्याचा पूर्ण अधिकार होता, तर भूमिधारींनी आपल्या जमिनी हस्तांतरित करण्यावर, ज्यामुळे त्यांना जमिनीतील त्यांचें कोणतेही हितसंबंध गहाण ठेवता येणार नाहीत इतक्या मर्यादेपर्यंत निर्बंध होते. मध्य प्रदेश जमीन महसूल अधिनियमाच्या कलम 15 अन्वये, भूमिस्वामीचा दर्जा प्राप्त करून घेण्याबाबत जिल्हाधिका-याकडे अर्ज केला असता तसेच भूमिधारीच्या जमिनीवर आकारलेल्या जमीन महसुलाच्या तिप्पट एवढी रक्कम त्याने भरली असता भूमिधारीला भूमिस्वामीचा दर्जा प्राप्त करून घेण्याचा अधिकार होता.
tag-
"Keyword"
"भोगवटादार वर्ग - 1 म्हणजे काय"
"भोगवटादार म्हणजे काय"
"देवस्थान इनाम जमीन शासन निर्णय"
"भोगवटादार वर्ग 2 जमिनी खरेदी"
"नवीन अविभाज्य शर्त म्हणजे काय"
"भोगवटादार वर्ग 2 चे वर्ग 1 मध्ये रूपांतर pdf"
Related searches
भोगवटादार वर्ग - 1 म्हणजे काय
भोगवटादार वर्ग 2 चे वर्ग 1 मध्ये रूपांतर pdf
भोगवटादार म्हणजे काय
देवस्थान इनाम जमीन शासन निर्णय
भोगवटादार वर्ग 2 जमिनी खरेदी
नवीन अविभाज्य शर्त म्हणजे काय
Post a Comment